Sunday, August 24, 2025
घरमहाराष्ट्रनवी मुंबईत विविध प्रकरणात दोन दिवसात चार पोक्सो गुन्ह्यांची नोंद

नवी मुंबईत विविध प्रकरणात दोन दिवसात चार पोक्सो गुन्ह्यांची नोंद

नवी मुंबई : नवी मुंबईतही विविध प्रकरणात दोन दिवसात चार पोक्सो गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. एक दहा वर्षीय विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीसोबत शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी दुकानात गेली होती. यावेळी आरोपी संजय गायकवाडने त्यांना अडवून शरीरावर विचित्र पद्धतीने स्पर्श केला. याबाबत त्यांनी पालकांना सांगितल्यावर त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात संजय गायकवाडविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनीही याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.नवी मुंबईत राहणाऱ्या सागर माथने याने एका १५ वर्षीय युवतीचा पाठलाग करून एका शाळेजवळ तिला गाठून तिच्याशी बळजबरीने लगट केली. तसेच तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते. याप्रकरणी पीडितेने पालकांना माहिती देताच सागरविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी सागर माथने विरोधात पोक्सो गुन्ह्याची नोंद केली आहे. नवी मुंबईतील आरोपीने अल्पवयीन पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर ती गरोदर झाल्याचे समोर आले आहे. याबाबत पालकांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आले नाही. पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील परिमंडळ दोन येथेही तारेख गाझीविरोधात पोक्सो गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेत आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीच्या घरासमोर जोरजोरात ओरडून तिच्यावर प्रेम करत असल्याचे सांगितले. याच काळात तारेख गाझीने सार्वजनिक ठिकाणी पीडित अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्या मनात लज्जा केल्याचा प्रकार समोर आला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments