सातारा(अजित जगताप) : सध्या महिला व युवतींवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस येत आहे. त्यामुळे समाजमन हेलावून गेले आहे. परंतु, साताऱ्यात अशा प्रवृत्ती विरोधात विद्यार्थी वर्गानेच हातात फलक घेऊन एक अभिनव व चांगला संदेश देण्याचे काम केले .त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी सांगितले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाचे द्वार खुले केले आणि एक चांगली सशक्त विचारसरणी या तरुणांच्या धमनीतून वाहू लागली. त्यामुळे महिला व माता वर्ग सुरक्षित राहू शकल्या. साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांनी हाती फलक घेऊन विद्यार्थिनींना दिलासा देण्याचे काम केलेले आहे. या फलकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. फलकाचा मजकूर असा आहे की, मित्रा जर स्वतःच्या बहिणीसाठी वाघ असशील तर……. दुसऱ्याच्या बहिणीसाठी पिसाळलेला कुत्रा होऊ नकोस…….. हा संदेश रस्त्यात उभे राहून सुमारे अर्धा तास येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. या विधायक उपक्रमासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी पृथ्वीराज चव्हाण, विनय बाबर, ओम जगताप, साहिल निमज, आत्रेय जाधव, शंभू पवार, सुरज बोराटे, वेदांत कुलकर्णी, ऋषिकेश कांबळे, अभिनव बाबर, राहुल निपाणी, आशिष मोरे, अजय जिमन, प्रयाग गाडे यांच्यासह ग्रामीण भागातील व शहरी भागातील विद्यार्थ्यांनी एक विधायक उपक्रम राबवला. या वेळेला निर्भय पथकातील पोलीस दलाचे जवान संकेत माने यांचेही बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
साताऱ्यातून अभिनव संदेशाने तरुणांनी केले चांगलेच प्रबोधन
RELATED ARTICLES