Monday, December 16, 2024
घरमहाराष्ट्रकर्जमुक्ती आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना मुंबईत अटक

कर्जमुक्ती आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना मुंबईत अटक

मुंबई (रमेश औताडे) : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, हक्काचा पिकविमा, सोयाबीन-कापूस दरवाढ यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी शेतकऱ्यांनी आत्महत्येचे प्रात्यक्षिक आंदोलन करताना शेतकऱ्यांना मुंबईत मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली.

शेतकरी नेते रविकात तुपकर यांनी या आंदोलनाची हाक दिली होती. त्यांनाही अटक करून किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर सुटका केली. पोलिसांना चकमा देत शेतकरी मुंबईत दाखल झाले होते. सगळे एकत्र गेलो तर पकडले जाऊ त्यामुळे काही शेतकरी वेगवेगळ्या ग्रुपने मुंबईत दाखल होऊन आंदोलनाच्या स्थळी पोहोचतील असे नियोजन तुपकारांचे होते.

तर दुसरीकडे मुंबईत येणाऱ्या प्रत्येक मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. तरीही पोलिसांना चकमा देऊन मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानाकडे निघाले होते. परंतु मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिसांनी रविकांत तुपकरांसह शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या व सरकारच्या या भूमिकेविषयी यापुढचे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा तुपकर यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments