मुंबई (शांताराम गुडेकर ) : मुंबई पश्चिम उपनगर मधील शिवसागर गोविंदा पथक मालाड( पुर्व) हे गेली ९ वर्ष दहीहंडी माध्यमातून चौथ्या थरावर एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात.२ वर्षापूर्वी अफजल खानाचा वध दाखवला आणि आताच्या सध्याच्या परिस्तिथीमध्ये महिलांवर आणि मुलींवर होणारे अत्याचार यावर त्यांनी देखावा सादर केला.यावर्षी पण नवीन संदेश दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शिवसागर गोविंदा पथकाचे प्रशिक्षक सेनापती श्री.प्रतीक बोभाटे यांची दरवर्षी संकल्पना असते.नवीन दाखवण्याचे आणि त्यांना नेहमी साथ देणारे खजिनदार किशोर कदम आणि संदीप कोलप,सहकारी वर्ग यांचे याकामी मोलाचे सहकार्य असते.हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी त्या हंडीला असणारे मावळे यांचा उत्साह असतो.म्हणूनच सगळे शक्य होते असे मंडळ पदाधिकारी सांगतात.चिपळूणचे सुपुत्र संदीप शिंदे दादांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला.तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला.चिपळूणचे सुपुत्र घाटकोपर येथील रहिवाशी समाजसेवक नितीन जाधव यांनी हा व्हिडीओ कोणत्या मंडळ आणि कुठला आहे त्यांचा नंबर घेऊन माहिती मिळवली.त्यामुळे एका चांगल्या गोविंदा पथकची सविस्तर माहिती उपलब्ध होऊन लोकांमध्ये चांगली जनजागृती झाली.
शिवसागर गोविंदा पथक मालाड (पुर्व)तर्फे दरवर्षी विविध जनजागृती करणारे दिले जातात संदेश; यावर्षी दादर पश्चिम आयडियल येथे मंडळ तर्फे संदेशसह पाहता येणार दहीहंडीचा थरार
RELATED ARTICLES