प्रतिनिधी : धगधगती मुंबई वृत्तपत्राचे संपादक भिमराव धुळप आणि शिवसेना विभाग क्रं १० (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे उपविभागप्रमुख यशवंत विचले यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा दादरमध्ये केशवराव दाते मैदान,डॉ आगाशे पथ, दादर (पश्चिम) मुंबई – २८ येथे दहीकाला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी १०० गोविंदा पथके सहभागी होत असतात,त्यांना एकूण बक्षिसाची रक्कम २.५० लक्ष रुपये खर्च करत असतो.मात्र यावर्षी यापैकी फक्त २५ गोविंदा पथकांना संधी देऊन उर्वरित ७५ गोविंदा पथकाची रक्कम ही गरीब रुग्णाच्या वैधकीय मदतीसाठी वापरण्यात येणार आहे. दहीकाला उत्सवास खंड पडू नये,म्हणून काही कारणास्तव हा उत्सव मोजक्याच स्वरूपात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत साजरा करणार आहोत. असे आयोजक पत्रकार भिमराव धुळप व उपविभागप्रमुख यशवंत विचले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
धगधगती मुंबई व शिवसेना (उबाठा) तर्फे दहीकाला उत्सवाचे आयोजन; २५ गोविंदा पथकांना संधी, ७५ गोविंदा पथकाचे पैसे वैधकीय मदतीसाठी
RELATED ARTICLES