Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रदेवरुख -बोंड्ये एस. टी सुरु.... गावकऱ्यांची प्रतीक्षा संपली.. आता होणार सुखाचा प्रवास

देवरुख -बोंड्ये एस. टी सुरु…. गावकऱ्यांची प्रतीक्षा संपली.. आता होणार सुखाचा प्रवास

कोकण (शांताराम गुडेकर ) : रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर मार्गांवरील बोंड्ये गावातील नागरिकांची एस. टी ची प्रतीक्षा संपली असून आजपासून पुन्हा देवरुख -बोंड्ये एस. टी. ही देवरुख एस. टी आगार मधून सोडण्यात आली.बोंडये बससाठी पत्रकार संदीप गुडेकर, माजी सरपंच ललिता गुडेकर, विद्यमान सरपंच नम्रता पांचाळ यांनी देवरुख आगार व्यवस्थापक यांना पत्रव्यवहार करून झाडीची असलेली अडचण तसेच पडलेले खड्डे ही समस्या मार्गी लागली असून देवरुख -बोंड्ये एस. टी सुरु करावी अशी मागणी केली होती. त्या मागणीचा विचार करून देवरुख आगार व्यवस्थापक यांनी एस. टी सुरु केली.त्यामुळे बोंड्ये गावच्या नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून लोकप्रतिनिधी, संबंधिक अधिकारी यांचे आभार मानले आहेत.कारण काही दिवसांवर गणपती उत्सव आहे.हजारो मुंबईकर,अन्य भागातील पाहुणे या मार्गांवरून ये -जा करणार असून त्यांनाही या समस्याला तोंड द्यावे लागणार होते .विद्यार्थी,चाकरमनी(मुंबईकर ),नोकर दार वर्ग यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार होता.मात्र लोकप्रतिनिधी, देवरुख आगार- रत्नागिरी विभाग यांनी मागणीची दाखल घेत एस. टी. सुरु त्यामुळे संभाव्य त्रासातून बोंड्ये गावातील लोकांची सुटका झाली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments