प्रतिनिधी : बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या गंभीर घटनेनंतर जनउद्रेक होईपर्यंत ढिम्म राहिलेले बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे या शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेत्याने, महिला पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी असभ्य भाषेत केलेल्या विकृत शेरेबाजीचा मुंबई मराठी पत्रकार संघ तीव्र निषेध करत आहे.
तुम्ही घटनेचे वार्तांकन असे करताय की जणू अत्याचार आपल्यावरच झाला, असे कमालीचे हीन वक्तव्य वामन म्हात्रे यांनी पत्रकार मोहिनी जाधव यांना उद्देशून केले आहे.
वामन म्हात्रे यांच्या या वक्तव्याचा मुंबई मराठी पत्रकार संघ तीव्र निषेध करीत आहे. वामन म्हात्रे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघ करत आहे.