Monday, August 25, 2025
घरआरोग्यविषयकशिवसेना(उबाठा) शिव आरोग्य सेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने शिवसेना भवन दादर येथे रुग्णांना...

शिवसेना(उबाठा) शिव आरोग्य सेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने शिवसेना भवन दादर येथे रुग्णांना मोफत औषध व वैद्यकीय उपकरणे वाटप

मुंबई (शांताराम गुडेकर ) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते,मा.परिवहन मंत्री श्री.दिवाकर रावते,उपनेते श्री.रविंद्र मिर्लेकर तसेच शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, मा.आमदार श्री.दगडू दादा सकपाळ यांच्या शुभहस्ते शिव आरोग्य सेना कार्याध्यक्ष डॉ.किशोरजी ठाणेकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र दगडु(दादा) सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या मागणीनुसार शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा व हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने शिवसेना भवन दादर या ठिकाणी माहीम येथे राहणाऱ्या श्रीमती.सविता शेटकर(वय- ७४वर्ष ) या कॅन्सर ग्रस्त रूग्ण महिलेस लागणारी विविध औषधे तसेच वैद्यकीय उपकरणे मोफत,त्यामध्ये प्रामुख्याने नेब्युलायझर मशिन तसेच आरोग्य सेनेचे फार्मसी सेलचे बांद्रा विधानसभा अध्यक्ष राधेश्याम ठाकुर यांच्याकडुन ग्लुकोमीटर मशीन आणि पल्स ऑक्सीमीटर ही उपकरणे रुग्णाचे नातेवाईक अभय शेटकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.तसेच अंधेरी येथे राहणाऱ्या काशीबाई बाबुराव नटवे( वय-७६ वर्षे) यांना कानाची मशीन मोफत देण्यात आली. याप्रसंगी आरोग्य सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ.प्रशांत भुईंबर,ठाणे जिल्हा समन्वयक व अध्यक्ष हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे एकनाथ अहिरे समन्वयक सह सचिव सचिन त्रिवेदी,देवशी राठोड,उल्हास शिवणेकर,अझीम शेख,राजेंद्र भोसले उपस्थित होते.तद्प्रसंगी पेशंटच्या नातेवाईकांनी शिव आरोग्य सेनेचे मनःपुर्वक आभार मानले व आम्ही सदैव शिवसेनेच्या सोबत ठामपणे आहोत असे उदगार काढले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments