भोसे(रविकांत बेलोसे) : कावडी, हातगेघर, विवर, सायघर आखेगणी, पानस या सहा गावचे कार्यक्षेत्र असणाऱ्या हातगेघर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी प्रवीण गुजर यांची तर व्हाइस चेअरमनपदी नारायण मारुती पार्टे यांची आज बिनविरोध निवड झाली. याबद्दल नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुंमरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

हातगेघर सोसायटीच्या करहर येथील कार्यालयात आज या निवडी बिनविरोध पार पडल्या. यावेळी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष व संस्थेचे संचालक वसंतराव मानकुंमरे , माजी चेअरमन भानुदास गावडे, व्हाईस चेअरमन प्रकाश गोळे, संचालक अशोक गोळे, सुभाष गुजर, मारुती धनावडे, सविता दीपक गावडे , श्रीमती सीताबाई गेंनदेव गावडे तसेच सामाजिक कार्यकर्ते अशोक गोळे यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बोलताना वसंतराव मानकुमरे म्हणाले सोसायट्या ह्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीची प्रमुख नाडी आहे. त्यामुळे या सोसायट्या आर्थिक सक्षम करण्याबरोबरच त्या टिकल्या पाहिजेत आणि पारदर्शक कारभारातून त्या सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरल्या पाहिजेत.
यावेळी बोलताना नवनिर्वाचीत चेअरमन प्रवीण गुजर म्हणाले सर्व संचालकांनी आमचेवर टाकलेली जबाबदारी सर्वांना बरोबर घेवून यशस्वीपणे पार पडणार आहे. सोसायटीच्या आर्थिक सक्षमतेसाठी आपण प्रामाणिकपणे काम करणार आहे.
व्हा. चेअरमन नारायण पार्टे यांनी सांगितले सर्व संचालकांना विश्वासात घेऊन आपली पुढची वाटचाल असणार आहे. सर्वांनी आमचेवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
माजी चेअरमन भानुदास गावडे यांनी प्रास्ताविक केले तर सचिव विजय यादव यांनी आभार मानले.
या निवडीबद्दल गुजर आणि पार्टे यांचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले , जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मांनकुमरे, आर. के. धनावडे, जावळी बँकेचे संचालक चंद्रकांत गावडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख नितीन गोळे, तालुका उपप्रमुख रवी पार्टे आदींनी अभिनंदन केले आहे.