मुंबई (शांताराम गुडेकर ) : साई भावी सेवा ट्रस्टचे संचालक श्री. मंगेश रासम यांच्या मार्गदर्शनाखाली सतत वेगवेगळे कार्यक्रम राबविले जातात.यावेळी दुःखीत व्यादिने त्रस्त अशा मुलांना व जेष्ठ नागरिक यांना टिफिन सेवा व रुग्णाना मोफत सेवा साहित्य वाटप करण्यात आले आहे.तसेच यावर्षीचा आदिवासी भागात रुग्णाना मदत करण्याचा हा २३ वा कार्यक्रम चिंचघर पोस्ट कुरझें तालुका विक्रमगड जिल्हा पालघर येथे अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडला.एकूण ३४ जीवनावश्यक वस्तुरूपाने विशेष वाटप करण्यात आले.हे सर्व करत असताना लोकांच्या मनामध्ये जो आनंद निर्माण होतो हीच गोष्ट महत्वाची आहे.या संस्था अनेक वर्ष हेच काम करत आहेत.जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे मानून हे कार्य अहोरात चालू आहे.या कामी रासम परिवार,श्री.अनिल वडके,सौ.अनिता वडके,जननी फॉउंडेशन श्री. /सौ. पुष्पा शंकर भालेराव,जाणीव ग्रुप जोगेश्वरी, महेश मेहता ग्रुप, प्रीती भुच,शरद बाक्ती,ग्लडी डिसोजा,प्रकाश राशींकर, प्रशांत पिळे,भाविन पांचाळ, तुशीदास तांडेल, दीपक आकरे,रामकिरण गुप्ता,यशवंत वालास,अंतेश्वर पाटील,दर्शना पाटील,आस्विनी घोडडे,नवनाथ हंबीरे या सर्वांच्या सहकार्याने मोठ्या उत्सवात कार्यक्रम संपन्न झाला.साई परिवाराचे मंगेश रासम व अनिल वडके यांनी सर्वाचे मनस्वी आभार मानले. ही सेवा आणखी वाढावी असा अभिप्रायही सर्वानी दिला.
साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली चारकोप तर्फे आदिवासी भागात रुग्णांना मोफत साहित्य वाटप
RELATED ARTICLES