मुंबई (प्रतिनिधी) : बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री भरत रामचंद्र घाणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भरत घाणेकर मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मागाठाणे जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या समोरील भागात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात पाच तासात सुमारे पावणे दोनशे लोकांनी रक्तदान केले. सुमारे एकशे चोपन्न बाटल्या रक्त जमा झाले. बोरीवली रक्तपेढी तर्फे हे रक्तसंकलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार गोपाळ शेट्टी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य, योगेश वसंत त्रिवेदी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री श्याम कदम आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वरुण घाणेकर कार्यक्रमास लक्ष्मीकांत नाईक, रमेश घाणेकर, संदेश कोलापटे, संजय घाडगे, सिद्धेश्वर वाघचौरे, नरेंद्र माली, अशोक पडीयार, हरिश्चंद्र कत्वांकर, बिपिन सावंत यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गायत्री नाईक, हृदया घाणेकर, रोहित गुप्ता, ओमकार कणसे, गीत घाणेकर, निशांत पेडणेकर, राहुल वाडीकर, पार्थ नगवदरिया आदींनी परिश्रम घेतले.
