Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रमतदारांना २० ऑगस्टपर्यंत मतदार यादीसोबत मोबाईल क्रमांक जोडता येणार?

मतदारांना २० ऑगस्टपर्यंत मतदार यादीसोबत मोबाईल क्रमांक जोडता येणार?

मुंबई : मुंबईतील मतदारांना २० ऑगस्टपर्यंत मतदार यादीसोबत मोबाईल क्रमांक जोडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या विविध सूचना आणि माहिती नागरिकांना मोबाईलवर मिळणे शक्य होणार आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दुसऱ्या विशेष संक्षित पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. कार्यक्रमअंतर्गत पात्र नव मतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील तपशीलामध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करण्याची संधीदेखील उपलब्ध आहे. यापैकी एक महत्वाची बाब म्हणजे यादीला मोबाईल क्रमांक जोडून घेणे ही होय. निवडणूक आयोगाकडून पाठवण्यात येणाऱ्या माहितीमध्ये मतदान केंद्र, मतदानाची तारीख, मतदानाची वेळ इत्यादी महत्वाची माहिती समाविष्ट असते. निवडणूक आयोगाच्या वतीने राबवले जाणारे उपक्रम, मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्या संदर्भातील अर्जावरील कार्यवाही सुलभ होते. मोबाईल क्रमांक जोडण्याचे फायदे नव मतदार नोंदणीचा अर्ज भरताना आपल्याला अर्जात स्वतःचा मोबाईल क्रमांक देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. इतर कोणत्याही मतदार ओळखपत्रासाठी वापरला न गेलेल्या स्वतःचा असा मोबाईल क्रमांक दिल तर तो मतदार यादीत आपल्या नावासोबत जोडला जातो.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments