Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रनागपूर, विदर्भवंचितांच्या विकासाचे डॉ.आंबेडकरांचे स्वप्न मोदी सरकारने पूर्ण केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वंचितांच्या विकासाचे डॉ.आंबेडकरांचे स्वप्न मोदी सरकारने पूर्ण केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी : देशातील वंचित, गरिब, आदिवासी, शेतकरी यांचा विकास करण्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकार केले. मोदी सरकार यापुढच्या काळातही वंचितांना न्याय देईल,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अकोला येथे केले. अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपा- महायुतीचे  उमेदवार अनुप धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना  झालेल्या ‘विजय संकल्प सभेत’ श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे, आ.श्वेता महाले आदी उपस्थित होते. वंचितांच्या कल्याणासाठी यापुढेही  सरकारी योजनांचा पैसा प्राधान्याने खर्च केला जाईल. यावेळची निवडणूक ही जनतेची निवडणूक आहे. जनतेचा पंतप्रधान पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी अनुप धोत्रे यांना विजयी करा,असे आवाहनही श्री. फडणवीस यांनी केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देशाचे संविधान सुरक्षित असल्याचे नमूद करत श्री. फडणवीस म्हणाले की, अस्तित्वाच्या भीतीमुळे संविधान बदलण्याविषयीचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांना धर्मग्रंथापेक्षाही संविधान महत्त्वाचे आहे. अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस सारख्या २ लाखांहून अधिक नेत्यांना, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आणीबाणी लादून तुरुंगात टाकण्याचे महापाप काँग्रेसने केले. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संविधानाचा गैरवापर केला होता, याचे श्री.फडणवीस यांनी स्मरण करून दिले .

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments