प
्रतिनिधी : भगवा सप्ताह अभियान निमित्त धारावी विधानसभा क्षेत्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्रमांक १८६ अतर्गत १५ ऑगस्ट २०२४ देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने “स्वछ मुंबई सूंदर मुबंई” हा संदेश देत सोसायटीतील नागरिकांना “ओला कचरा, सुखा कचरा” वेगळा जमा करण्यासाठी मोठे डबे वाटप करण्यात आले.यावेळी माजी कार्यसम्राट नगरसेवक वसंत नकाशे,शाखाप्रमुख किरण काळे यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी शिवसैनिक,युवासैनिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी आपला माणूस,नगरसेवक वसंत नकाशे (आप्पा), किरण काळे यांचे आभार मानले.