कोरेगाव (अजित जगताप) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र नामदार एकनाथ शिंदे गटाचे कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव येथे
वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमामध्ये आपण लाडकी बहिण योजनेबाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज चोळी – बांगडी भेट पाठवून निषेध व्यक्त केला आहे. सध्या लाडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा होत आहे. यानिमित्त विधानसभेच्या निवडणुकीत मतदार महिला वर्गाने महायुतीचे काम करावे व त्यांनाच मतदान करावे. यासाठी दबाव तंत्र वापरले जात आहे. त्यामुळेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एका गावातील लाभार्थीचे नाव कमी करु व त्यांना मराठा आरक्षण देऊ असे भाष्य केले होते. त्याचा पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उठवण्यात आलेला आहे. मराठा योद्धा श्री मनोज जारंगे पाटील यांनीही आमदार महेश शिंदे यांचा समाचार घेतलेला आहे. टिकेची झोड उठवली असतानाच सातारा जिल्ह्यातील आ. महेश शिंदे यांच्या विरोधात महिलावर्ग संताप व्यक्त करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला पदाधिकाऱ्यांनी आज सातारा येथील पोस्ट कार्यालयात जाऊन आमदार महेश शिंदे यांच्या खटाव येथील निवासस्थानी चोळी बांगडी व माफीनामा लिहून द्या असे पत्र पाठविले आहे. त्यामध्ये शाब्दिक निषेध व्यक्त केलेला आहे. आमदार महेश शिंदे यांनी तमाम महिला वर्गाची जर जाहीर माफी मागितली नाही तर यापुढील आंदोलन आक्रमकरीत्या करून त्यांना त्यांची जागा दाखवण्यात येईल. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला राज्य सदस्या सौ समिंदरा जाधव यांनी दिलेला आहे. आज वास्तविक पाहता केंद्र व राज्य सरकारची योजना ही कोणत्याही पक्ष अथवा
लोकप्रतिनिधी यांची नसते तर ती जनतेच्या विकासाशी निगडीत असते. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण आणता येत नाही हे संकेत आहेत. त्यामुळे आम्ही या सर्वांचा निषेध करीत आहोत. आपण आमच्या माता भगिणींची माफी मागुन या विषयावर पडदा टाकावा. ही आपल्या राजकीय कारकीर्दीसाठी मैलाचा
दगड ठरणार आहे. आपण जाहीर माफी मागुन हा विषय संपवायला हवा अशी आशा आम्ही व्यक्त करतो. आपण जर असे केले नाही तर तमाम माता भगिणी लोकशाहीने दिलेल्या मतदानाच्या अधिकारातुन आपणाला आपली जागा दाखवतील. शेवटी
निर्णय देणे आपल्या हातात आहे.
तरी आपण माता भगिणींची माफी मागितली नाही तर सर्व माता भगिणी रस्त्यावर उतरुन आंदोलन करु. व माता भगिणींचा फॉर्म रिजेक्ट झाल्यास त्या सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. असेही स्पष्ट केले आहे. या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी महिला
सुषमा राजेघोरपडे, प्राची ताकतोड,शारदा भस्मे ,नूतन गायकवाड ,रेश्मा खरातपूजा सोनवणे ,कविता बनसोडे
प्रजावती बनसोडे,आशा जाधव ,स्वाती निंबाळकर ,साक्षी शिवगण ,अर्चना पाटील ,नलिनी जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या. आमदार महेश शिंदे यांनी शिवसेनेची मते मिळवून आमदार बनले असले तरी पक्षाशी गद्दारी केल्यामुळे त्यांना माजी आमदार होण्याची घाई झालेली आहे. अशी ही महिला वर्गामध्ये चर्चा सुरू झाली आहे. यावेळी महिला वर्गाने संतप्त घोषण दिल्या. मतदारांचे आहेत मिंधे.., आमदार महेश शिंदे…,, लाडक्या बहिणीचा कराल अपमान, आता धडा शिकवेल त्यांचे मतदान… अशाही घोषणाबाजी दिल्या असल्याची माहिती महिलांनी दिली.


