मुंबई (शांताराम गुडेकर ) : मुंबई सह उपनगर, कोकण विभागात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या पंचरत्न मित्र मंडळ(रजि.) आणि आर.सी.एफ चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेय विद्यार्थी यांच्या आरोग्य करिता मोफत वैद्यकीय शिबीर, नेत्र तपासणी, स्वच्छता किट आणि खाऊ, औषधे, स्टील कपाट वाटप कार्यक्रम नुकताच अयोध्या नगर,बृहन्मुंबई महानगरपालिका प्राथमिक उ.मराठी शाळा, वाशी नाका, चेंबूर, मुंबई -४०० ०७४ येथे पार पाडला.या कार्यक्रमाला शरद सोनवणे (कार्यकारी संचालक -मानव संसाधन आर. सी. एफ )आणि विशेष पाहुणे म्हणून मधुकर पाचरणे (उप महाव्यवस्थापक आर. सी. एफ. चेंबूर ),संतोष शिकतोडे(उप अभियंता, नवी मुंबई ), तज्ज्ञ डॉ. विनीत गायकवाड, डॉ.रणधीर कुमार सिंग ,डॉ. रजनीश कुमार,डॉ. सुधाकर पाटील, शाळेचे प्राचार्य सौ. सुमन पाटील, यांच्या सहित मंडळ अध्यक्ष अशोक भोईर, सचिव -प्रदीप गावंड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते..सौ. स्नेहा नानीवडेकर यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करत स्वागत केले.उल्लेखनीय काम करत विशेष प्रवीण्य मिळालेल्या शिक्षक वर्गाचा यनिमित्ताने सत्कार करण्यात आला. प्राचार्य सौ. सुमन पाटील यांनी शाळेत सातत्याने मदत करणाऱ्या पंचरत्न मित्र मंडळच्या कार्याचे कौतुक करत सर्व पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, हितचिंतक यांचे आभार मानले.मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना औषधे,स्वच्छता साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले.या कार्यक्रमचे सूत्रसंचालन सौ. स्नेहा नाणीवडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अध्यक्ष अशोक भोईर यांनी केले.
पंचरत्न मित्र मंडळ, चेंबूर आर सी एफ तर्फे गेल्या १८ वर्षाहून अधिक काळात समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत आहे. मंडळाचे कार्यतत्पर अध्यक्ष गुणवंत कामगार श्री.अशोक भोईर व सहकारी प्रामुख्याने आदिवासी,अंध विकलांग , वृद्धाश्रम यांना सर्वतोपरी सहाय्य करते.गरीब गरजूंसाठी निशुल्क मेडीकल कॅम्प ,नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अन्नधान्य,कपडे,गृहोपयोगी वस्तू,औषधे,वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे,नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणेतसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे.समाजाला मदतीचा हात देत गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष – अशोक भोईर,सचिव प्रदीप गावंड,खजिनदार -सचिन साळुंखे, सहसचिव वैभव घरत,सौ.स्नेहा नानीवडेकर,सल्लागार हनुमंता चव्हाण,सचिन डेरे, संदीप पाटील,सौ.नीलम गावंड, सतीश कुंभार, सुशील मेस्त्री, युथ कौन्शील संस्थेचे नागपुरे, डी. निंबाळकर, तांबे, मंडळ छाया चित्रकार मॅथ्यू डिसोझा आणि सर्व महिला -पुरुष कार्यकर्ते, सदस्य आणि सभासद यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी केलेल्या विशेष परिश्रममुळेच गेली १८ वर्ष सातत्याने कार्यक्रम यशस्वी होतात असं मत यानिमित्ताने मंडळ अध्यक्ष अशोक भोईर यांनी व्यक्त केले.
पंचरत्न मित्र मंडळ(रजि.)चेंबूरतर्फे मोफत वैद्यकीय शिबीर सह स्वच्छता किट,खाऊ, शालेय साहित्य,स्टील कपाट,औषधे वाटप
RELATED ARTICLES