मुंबई : जनता दलाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगर पथ विक्रेता समिती निवडणुकीसाठी पैनल तयार करत आहेत. जनता दल पॅनलचे नेतृत्व महाराष्ट्र जनता दलाचे सचिव आणि शिववडापावचे माजी उपाध्यक्ष भगवान साळवी करत आहेत. पथ विक्रेता (उपजिवीका सरंक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेत १ मुख्य समिती व इतर परिमंडळ समितीची निवडणूक २९ ऑगस्टला होत आहे.

यावेळी भगवान साळवी म्हणाले की, जनता दलाशी इतर अपक्ष उमेदवारांनी संपर्क
साधला आहे आणि जनता दलाकडे उमेदवार नसलेल्या प्रवर्गात ते युती करण्यास इच्छुक आहेत. भगवान साळवी व आदी उमेदवारांनी निवडणुक अधिकारी श्रीमती निशा नगरारे यांच्याकडे निवडणुकीसाठी अर्ज भरले.
यावेळी जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सुरेंद्र कुमार बाजपेयी, पथविक्रेते तानाजी मालुसरे, अनिलकुमार कांदु, अशोक मालुसरे, लक्ष्मण साळवी, राम दाभेकर आदी फेरीवाले उपस्थित होते.