Wednesday, October 15, 2025
घरमहाराष्ट्रप्रशांत यादव सहकुटुंब मार्लेश्वरचरणी नतमस्तक श्रावणी सोमवारनिमित्त श्री देव मार्लेश्वरला अभिषेक पदाधिकारी,...

प्रशांत यादव सहकुटुंब मार्लेश्वरचरणी नतमस्तक श्रावणी सोमवारनिमित्त श्री देव मार्लेश्वरला अभिषेक पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांचीही उपस्थिती

संगमेश्वर (शांताराम गुडेकर ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी श्रावणी सोमवारनिमित्त सहकुटुंब मारळ (ता. संगमेश्वर) गावातील प्रसिद्ध श्री देव मार्लेश्वराचे दर्शन घेत अभिषेक घातला.यावेळी प्रशांत यादव यादव यांच्यासोबत चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना प्रशांत यादव, कु.स्वामिनी प्रशांत यादव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबा साळवी, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, देवरुखचे शहराध्यक्ष निलेश भुवड, चिपळूणचे शहर उपाध्यक्ष राकेश दाते, दीपक भेरे, वाशिष्ठी डेअरीचे संचालक प्रशांत वाजे, अविनाश गुडेकर, महेश खेतले, राष्ट्रवादी युवकचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, माजी सभापती मधुकर गुरव यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते. यावेळी पाटगावचे जंगम महादेव स्वामी यांनी मंत्रोच्चारात अभिषेक केला. तर मार्लेश्वर ट्रस्टच्या वतीने योगेश लिंगायत यांनी प्रशांत यादव आणि त्यांच्या कुटुंबियांचे शाल, श्रीफळ, पुष्गुच्छ देऊन स्वागत केले. वाशिष्ठी डेअरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या दोन्ही माध्यमातून माझ्या हातून लोकाभिमुख कार्य घडो आणि माझ्या मायबाप जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी मला अधिक बळ मिळो तसेच शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी, युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी आणि महिलांना, तरुणीना सक्षम करण्यासाठी माझ्या हातून कायम विधायक कार्य घडो, अशी प्रार्थना करत प्रशांत यादव श्री देव मार्लेश्वरच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी कार्यकर्त्यांनीही प्रशांत यादव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि यादव कुटुंबाला त्यांचे सामाजिक कार्य अखंडित सुरू ठेवण्यासाठी दीर्घायुष्य लाभो तसेच त्यांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांना यश मिळो, असे साकडे श्री देव मार्लेश्वरच्या चरणी घातले. यावेळी प्रशांत यादव यांनी देवस्थान ट्रस्ट प्रतिनिधी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments