Wednesday, August 6, 2025
घरमहाराष्ट्रभारतातील बंदर व गोदी कामगारांचा बेमुदत संप

भारतातील बंदर व गोदी कामगारांचा बेमुदत संप

मुंबई (रमेश औताडे) : भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून नवीन वेतन करार लागू आहे. आत्तापर्यंत द्विपक्षीय वेतन समितीच्या ७ मिटिंग झाल्या, परंतु कोणतीही सन्माननीय तडजोड न झाल्यामुळे नाईलाजाने २८ ऑगस्ट २०२४ पासून किंवा त्यानंतर केव्हाही बंदर व गोदी कामगार आपल्या मागण्यांसाठी बेमुदत संपावर जातील, असा स्पष्ट इशारा अखिल भारतीय बंदर व गोदी कामगारांच्या पाचही मान्यताप्राप्त महासंघाच्या नेत्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

प्रमुख बंदरातील कामगार संघटनांनी १२ ऑगस्ट २०२४ रोजी पोर्ट प्रशासनाला संपाची नोटीस दिली आहे.
भारतातील प्रमुख बंदर व गोदी कामगार महासंघांच्या राष्ट्रीय समन्वय समितीची मिटिंग ७ आणि ८ ऑगस्ट २०२४ रोजी व्हीओसी पोर्ट, तुतीकोरीन येथे झाली. या राष्ट्रीय समन्वय समितीच्या बैठकीत एकमताने प्रमुख बंदरांच्या सर्व गोदी कामगार व पेन्शनर्स यांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी बेमुदत राष्ट्रव्यापी संप करण्याचा निर्णय घेण्यात आला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments