Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्र"लहुजी क्रांती मोर्चा" चा वर्धापन दिन १६ आगस्टला

“लहुजी क्रांती मोर्चा” चा वर्धापन दिन १६ आगस्टला

मुंबई ( रमेश औताडे) : सत्यशोधक, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती व “यह आझादी झूठी है, देश की जनता भुखी है” या ऐतिहासिक घोष वाक्याला ७७ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त १६ आगस्ट रोजी सकाळी १० वाजता दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पू.) मुंबई येथे लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीने ६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. मधुकर गायकवाड (अधीक्षक व पथकप्रमुख, मेडीसिन विभाग, जे जे हॉस्पिटल, मुंबई) तर प्रा. डी. आर. ओहोळ (राष्ट्रीय प्रधान महासचिव – बामसेफ) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ऍड शेल्हाळकर,दीपक लोंढे, प्रा .पी. बी. लोखंडे,प्रा.डी.आर. कसाब व वरिष्ठ मार्गदर्शक अंकल सोनवणे उपस्थित राहणार आहेत.

अशी माहिती लहुजी क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य संयोजन समितीचे प्रदेशाध्यक्ष नितीन कांबळे व प्रा.विकास पाथरीकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments