जावळी – वंदनीय हिंदुहृदसम्राट श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यनेते ना.श्री.एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच सातारा जिल्हा पालकमंत्री ना.श्री.शंभूराजे देसाई व सातारा जिल्हाप्रमुख श्री.पुरुषोत्तम जाधव यांच्या शिफारशीने मुख्यमंत्री महोदय याचे खंदे समर्थक आणि जावळी तालुक्यातील शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून ओळख असणारे सातारा जिल्हासह संपर्कप्रमुख श्री.एकनाथ ओंबळे साहेब याच्या प्रयत्नाने सातारा / जावळी विधानसभा प्रमुख पदी श्री.प्रशांत जी तरडे यांची निवड करण्यात आली तर जावळी तालुका संघटक पदी श्री.पांडुरंग वाघ यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी…तेटली गावचे सुपुत्र शिवजयंती उत्सव समितीचे सल्लागार युवा नेतृत्व उत्कृष्ट वक्ते सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक श्री.राम शिंदे यांच्या वर शिवसेना जावळी तालुका संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तसे नियुक्ती पत्र मुंबई या ठिकाणी बाळासाहेब भवन येथे शिवसेनेचे सचिव श्री.संजय जी मोरे तसेच सातारा जिल्हा संपर्कप्रमुख श्री.शरद जी कणसे याच्या हस्ते देण्यात आले.श्री.राम शिंदे याचे सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून.मित्र परिवार सोबत बामणोली विभाग मेढा विभाग कुडाळ विभाग तसेच जावळी तालुक्यातील गावागावातील तरुण वर्ग तसेच विविध क्षेत्रातील लोकांसोबत जिव्हाळ्याचे संबंध देखील आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुहावटी पासूनच्या उठावात सोशल मीडिया वर होणारी विरोधकांची चर्चा आणि त्या चर्चेला रात्री २..३ वाजे पर्यंत सडे तोड उत्तर देणारे हे व्यक्तिमत्व सोशल मीडिया असेल की व्यासपीठ संघटनेची आणि शिंदे साहेब याची बाजू विरोधका समोर भक्कम मांडत होते… त्याच बरोबर मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून तालुक्यात झालेली विकास काम त्यांचे विचार आणि संघटनेचे कार्य ते नेहमीच आपल्या तालुक्यात आणि विभागात प्रचार प्रसार करत असतात..शिंदे यांना सामाजिक कार्या सोबत राजकीय क्षेत्राची देखील चांगलीच आवड आहे.याचाच फायदा आगामी विधानसभा निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकात संघटनेला होईल यात शंका नाही..जन माणसात श्री.राम शिंदे याचे राहणीमान त्याची प्रतिमा ही चांगली असून आपल्या सामाजिक कार्यातून लेखनीतून आणि भाषणातून ते समाजाच्या लोकांच्या चांगलेच परिचयाचे आहेत. श्री.राम शिंदे यांना तालुका संपर्कप्रमुख म्हणून संधी देऊन एका हुशार प्रामाणिक आणि सर्व सामान्य कुटुंबातील तरुण मुलाचा संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सन्मान केला आहे अशी भावना १०५ गाव समाज आणि जावळी तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते याच्या कडून व्यक्त होत आहे. तर पालकमंत्री ना.श्री शंभुराजे देसाई जिल्हाप्रमुख श्री.जाधव साहेब सातारा जिल्हा संपर्कप्रमुख श्री शरद कणसे साहेब तसेच जिल्ह्यासह संपर्कप्रमुख श्री.एकनाथ जी ओंबळे साहेब यांनी या झालेल्या निवडी बद्दल समाधान व्यक्त केले..
