Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रलोकनिर्माण प्रतिष्ठान या राष्ट्रीय सेवाभावी संस्थेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा

लोकनिर्माण प्रतिष्ठान या राष्ट्रीय सेवाभावी संस्थेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा

मुंबई ( शांताराम गुडेकर) : चिपळूण तालुक्यातील पाग येथील कन्या शाळेत नुकतेच लोकनिर्माण प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून आणि पाग येथील सामाजिक कार्यकर्ते, शाळेतील शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी यांच्या समवेत वृक्षारोपण करण्यात आले. अनेक जातींची उपयोगी रोपवाटिकांची यावेळी लागवड करण्यात आली. कन्या शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून मोलाची मदत केली.
तत्पूर्वी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाची गरज येणाऱ्या भावी पिढीला जाणीव व्हावी या हेतूने शाळेमध्ये एक छोटासा कार्यक्रम घेण्यात आला. आज अनेक ठिकाणी जंगलतोड करून पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. अवेळी पाऊस, महापूर यासारख्या आपत्ती आपण पाहात आहोत. याला उपाय म्हणून वृक्षलागवड करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था वृक्षारोपण कार्यक्रम राबवितात. परंतु ज्या ठिकाणी वृक्षारोपण केले जातात त्यातील किती रोपे पुढील वर्षात जिवंत असतात ते तेथील स्थानिक रहिवाशांनी आपली जबाबदारी म्हणून पाहणं गरजेचं आहे. असे संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण कासार यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. तर पुढील वर्षी याच रोपांचे वाढदिवस गांडूळ खताचा केक कापून वृक्षारोपण साजरा केल्यास आपण केलेल्या कामाची पावती नक्कीच मिळेल असे संस्थेचे उपाध्यक्ष युयुत्सु आर्ते यांनी बोलताना सांगितले. यावेळी व्यासपीठावर उपस्थितांनी मार्गदर्शन पर भाषणं केली. संस्थेच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना पेन आणि चाॅकलेट चे वाटप करण्यात आले.सुत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापक मोरे सर यांनी केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर, सचिव संजय गोरीवले, माजी नगरसेवक संजय तांबडे, ज्येष्ठ नागरिक महादेव चिले, सामाजिक कार्यकर्ते नैनेश तांबडे, संदेश गोरीवले, विनायक वरवडेकर, महेश कांबळी, संभाजी घाटगे, अमित चिले , आयुष गोरीवले, पत्रकार संतोष शिंदे, सौ. सुविधा कासार, सौ. रुपाली भाटिया, सौ. दीपा कोलतेकर, सौ. वर्षा कोंडविलकर इ. मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments