मुंबई (रमेश औताडे) महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद ” ने राज्यातील ४ लाख ३० हजार फार्मासिस्टला जगभरात औषध क्षेत्रामध्ये आलेले नवीन तंत्रज्ञान व कृत्रिम प्रज्ञा ( ए आय ) च्या युगात सज्ज राहण्यासाठी व औषधांचे परिपूर्ण सखोल ज्ञान व भान येण्यासाठी ” फार्मासिस्टची उन्नत्ती ” हा कार्यक्रम अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत असल्याची माहिती अध्यक्ष अतुल अहिरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत शनिवारी दिली.
महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेला ७५ वर्ष झाली असून या अमृत महोत्सवानिमित्त नवीन अद्ययावत वास्तूत हा भव्य दिव्य कार्यक्रम १३ ऑगस्टला कालिदास नाट्यगृह येथे होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धर्मराव बाबा अत्राम, कॉन्सील ऑफ इंडिया, नवी दिल्ली अध्यक्ष डॉ माँटू बुमार पटेल व अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.