सातारा (अजित जगताप) : महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रांमध्ये चर्चेचा विषय असलेल्या मराठा आरक्षणाबाबत आज छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहरातील शिवतीर्थावर स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातारा दौऱ्याच्या वेळीच हे आंदोलन चर्चेचा विषय ठरले आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या माध्यमातून अधिकार मिळावे. त्यांच्या भविष्यासाठी आंदोलन होत आहे. बघता काय सामील व्हा…. मराठ्यांची एकच मागणी ५० टक्के च्या आतील ओबीसी प्रवर्गातून टिकाऊ आरक्षण…. जो घरात बसला तो मराठा कसला… बापाला दुष्काळ जगू देत नाही आणि मुलाला आरक्षण शिकू देत नाही…. एक दिवस आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी… असं फलक लावून हे आंदोलन शिवतीर्थ म्हणजे पोवई नाका या ठिकाणी करण्यात आले.
या वेळेला मराठा समाजातील सौ. वैशाली जाधव, सौ .सुवर्णा पाटील, सौ. तेजस्विनी केसरकर, ओमकार देशमुख, हर्षल शिंदे, अतुल शिंदे यांच्यासह मराठा समाजातील स्वाभिमानी युवक शांततेने नाक्यावर उभे होते. त्यांच्या हातातील फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
साताऱ्यात शिवतीर्थावर मराठा आरक्षणासाठी मुक आंदोलन…
RELATED ARTICLES