कोल्हापूर- कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्म झाल्याच्या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून त्यांनी या नाट्यगृहासाठी १० कोटी रुपयांची मदत जाहीर केली. कालच्या आगीनंतर नाट्यगृहातील विद्यृत वाहिन्यांची तपासणी महावितरण अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली नसल्याचे स्पष्ट केले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील कोल्हापुरात दाखल झाले आणि या नाट्यगृहाची पाहणी देखील केली. आज सकाळी राज्यसभेचे खासदार संभाजीराजे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांना संभाजीराजेंसमोर अश्रू अनावर झाले. खासदार संभाजीराजे यांनी सांगितले की, कोल्हापूरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि कुस्तीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासबाग मैदानाला भीषण आग लागली. महाराजांनी रोमच्या थिएटरच्या धर्तीवर उभारलेले हे अत्यंत देखणे नाट्यगृह आणि मैदान हे आमच्या सांस्कृतिक ठेव्याचे महत्त्वाचे भाग आहेत. यांचे जळणे पाहून मनाला तीव्र दुःख होत आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाने लोकांना भरपूर दिले . ते जळाले याची खंत आहे .
कोल्हापूर काँग्रेस तर्फे ५ कोटी निधी देणार आहेत.