Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रटपाल विभागाचा ग्राहकांच्या सोयीसाठी कांदिवली येथे महामेळावा ; खातेधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

टपाल विभागाचा ग्राहकांच्या सोयीसाठी कांदिवली येथे महामेळावा ; खातेधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी : प्रत्येक माणसाच्या जीवनाशी निगडीत व प्रत्येक व्यक्तीचा एक अविभाज्य घटक असलेल्या भारतीय टपाल विभागातर्फे नुकताच भारतीय टपाल विभागाच्या मुंबई उत्तर पश्चिम विभागातर्फे समता विद्यामंदिर येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास समता विद्यामंदिर
येथील विद्यार्थी व परिसरातील नागरिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात बचत खाते, सुकन्या समृद्धी योजना, आवर्ती जमा योजना ( रिकरिंग डिपॉझिट खाते), महिला सन्मान योजना, मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते, मुदत ठेव जमा खाते, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, इंडिया पोस्ट पेमेंटस बँक, नवीन आधार नोंदणी, आधार अपडेशन, डाक विमा योजना इत्यादि योजनांची माहिती देण्यात आली. वरील कार्यक्रमात नवीन आधार नोंदणी व आधार अद्ययावत करणे यासाठी परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबई उत्तर पश्चिम विभाग वरीष्ठ अधीक्षक श्री रुपेश सोनावले, यांनी उपस्थितांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments