प्रतिनिधी : तिर्थ क्षेत्र देवाची आळंदी येथे श्री विठ्ठल रुख्मिणी वारकरी शिक्षण संस्था यांच्या वतीने वारकरी संप्रदायाचे प्रसारण आणि ज्ञान देण्याच्या कार्याची दखल घेऊन ह.भ.प.दत्तात्रय पिंपरे महाराज (निपाणी) यांना ‘आदर्श किर्तनकार’ पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी रायगड सातारा व दत्तात्रय महाराज जावळी सहकारी बॅकेचे पदाधिकारी, त्याच बरोबर जावळी सातारा तालुक्यातून स्वराज्य फाऊंडेशन व नाम फाऊंडेशनचे पदाधिकिरी, कोयना कांदाटी सोळशी विभागातील ऊद्योजक क्षेत्रातील, शेक्षणिक क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना पुरस्कार मिळाल्याची माहिती लोकांना मिळाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातूनअभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोट
ज्ञानोबारायांच्या व माझ्या माता पित्यांच्या कृपाशिर्वादाने हा बहूमान प्राप्त झाला. असे गौरवोद्गार ह.भ.प.पिंपरे महाराज यांनी पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर काढले