Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेशआय टी रिटर्न फाईलसाठी भारतात प्रथमच मोबाईल ॲप सेवा

आय टी रिटर्न फाईलसाठी भारतात प्रथमच मोबाईल ॲप सेवा

मुंबई (रमेश औताडे) : भारतात प्रथमच आय टी रिटर्न फाईल आता मोबाईल ॲप च्या माध्यमातून भरण्यासाठी माय आय टी रिटर्न संस्थेने ने सोपी सुलभ सेवा भारताच्या आयकर विभागाची अधिकृत मान्यता घेऊन सुरू केली असल्याची माहिती स्कोरीडोव्ह चे संस्थापक साकार यादव यांनी दिली.

आयकर विवरणपत्रे फाइल करणे सुलभ व्हावे, त्या प्रक्रियेत क्रांती घडावी या हेतूने हे मोबाइल ॲप डिझाइन करण्यात आले आहे. थेट स्मार्टफोन्सच्या माध्यमातून कर फाइल करण्याची मुभा करदात्यांना मिळाली आहे. त्यासाठी त्यांना कोणतीही प्रत्यक्ष कागदपत्रे अपलोड करण्याची गरज भासणार नसल्याने कराचे फायलिंग घरात किंवा ऑफिसमध्ये बसून कुणीही भरू शकतो.

केवळ ९९ रुपयांत कर फायलिंग सेवा अचूकता, कार्यक्षमता व सर्व सरकारी नियमांची पूर्तता यांची निश्चिती करत भारत सरकारच्या आयकर विभागाने अधिकृत मान्यता दिली आहे. असे स्कोरीडोव्ह चे संस्थापक साकार यादव यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments