मुंबई (रमेश औताडे) : महाराष्ट्र शासन अंगीकृत सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीने प्रथमच सुरक्षा रक्षकांनचे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियन,रायगड हॉस्पिटल ब्लड रिसर्च सेंटर व चैतन्य नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर कामगार नेते व संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले यांनी नियोजन केले. शिबिरात पहिल्या टप्प्यात १०५ सुरक्षा रक्षकाने रक्तदान केलेले आहे.
मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके, सचिव नालींदे, कामगार नेते हनुमंतराव सुरवसे तसेच संघटनेचे पदाधिकारी प्रवीण विटेकर, दिनेश निकम, शिवाजी जाधव, दीपक चाळके, सुनील जायभाय मंडळाचे प्रशिक्षण अधिकारी इनामदार या सर्वांनी मोलाचा सहभाग घेऊन रक्तदान शिबिराचा कार्यक्रम यशस्वी पार पाडला.