मुंबई (शांताराम गुडेकर ) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त मुंबई येथे ऑल इंडिया ऐसी /एसटी एम्पॉईज वैलफेअर असोसिएशनचे आध्यक्ष पराग रामटेके यांना जन जागृती व समाज प्रभोधन कार्य समितीचे अध्यक्ष राकेश गायकवाड, यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी भेट देऊन त्यांचा सत्कार केला. त्यावेळेस संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. राकेश गायकवाड हे गेल्या अनेक वर्षा पासून सामाजिक उपक्रम राबवत आहेत. पालघर, वाडा जव्हार, मोखाडा यासारख्या आदिवासी दुर्गम भागात ते सामाजिक उपक्रम राबवत आहेत तसेच ते जादूचे प्रयोग देखील राबवतात. गेली अनेक वर्ष ते विविध ठिकाणी जादूच्या कार्यक्रमातून अंधश्रद्धा निर्मूळणाचे काम करीत आहेत. साहित्यकार अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनी राकेश गायकवाड यांनी पराग रामटेके यांची भेट घेत त्यांना अण्णा भाऊ साठे यांची कादंबरी भेट देत त्यांचा सत्कार करत संस्थेबाबत माहिती दिल्याचे राकेश गायकवाड यांनी सांगितले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेची कादंबरी भेट देत सत्कार
RELATED ARTICLES