Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रपत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचा क्रांती रत्न पुरस्काराने होणार सन्मान….

पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचा क्रांती रत्न पुरस्काराने होणार सन्मान….

कराड ( प्रतिनिधी) येवती ता.कराड गावचे सुपुत्र व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संघटक, दैनिक लोकमतचे पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांना 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त क्रांती रत्न पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना, मैत्री फाऊंडेशन,व रणरागिणी महिला मंच च्या वतीने पत्रकार नितीन वायदंडे यांनी दिली ,हा पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कराड अर्बन बँक शताब्दी हॉल येथे संपन्न होणार असून, अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव ,जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने ,सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे ,या कार्यक्रमास मनसेचे कराड शहराध्यक्ष सागर बर्गे , जयश्री गुरव ,रामभाऊ सातपुते, दाउद खान मुल्ला ,सांगली जिल्हा समन्वयक संभाजी राजे पाटील, शिवव्याख्याते विक्रांत पाटील उपस्थित राहणार आहेत या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन सुनिता भोसले, संचना माळी ,साधना राजमाने ,पत्रकार विजया माने, पत्रकार नितीन वायदंडे यांनी केले आहे .

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments