Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रकराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड ग्रामीण रबर प्रीमियम लीग २०२४ चे...

कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड ग्रामीण रबर प्रीमियम लीग २०२४ चे १० व ११ आगस्टला आयोजन

प्रतिनिधी : कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव नायकवडी यांचा २६ जुलै २०२४ ला वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने कोपरखैरणे, नवी मुंबई येथील भूमिपुत्र मैदान येथे १० व ११ आगस्ट रोजी  मोहनराव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त रबर प्रीमियम लीग २०२४ भरवण्याचे ठरविण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकारणी सदस्य डॉ. अतुल बाबा भोसले, नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत. यावेळी या स्पर्धेमध्ये अनेक संघ सहभागी होणार असून प्रथम पारितोषिक ४१००१ रुपये असणार आहे, द्वितीय पारितोषक ३१००१ रुपये असणार आहे. व तृतीय पारितोषिक २१००१ रुपयाचे असणार आहे.त्याचबरोबर मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यावर देखील बक्षिसांचा वर्षाव करण्यात येणार आहे.  स्पर्धेला सर्व चषक आणि सामनावीर यांच्या पुरस्कार मोहनराव नाईकवडी मामा यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा भूमिपुत्र मैदान सेक्टर २३ कोपरखैरणे, नवी मुंबई येथे संपन्न होणार आहेत.तरी या संधीचा सर्व क्रिकेट रसिक प्रेमींनी आनंद घ्यावा असे  ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments