मुंबई (रमेश औताडे) : मुंबईतील गिरणी कामगारांच्या अस्तित्वाच्या प्रलंबित मागण्यासाठी गिरणी कामगार व त्यांचे वारस ९ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

भारतमाता लालबाग मुंबई येथे दुपारी १.०० वाजता हजारो गिरणी कामगार व त्यांचे वारस आमरण उपोषण, मागण्या मान्य होईपर्यत करणार आहेत. जेष्ठ सामाज सेविका मेधा पाटकर, संजय गोपाळ, जगदीश खैरालिया उपस्थित राहाणार आहेत. या उपोषणाला “गिरणी कामगार एकजुट” च्या सात संघटनांनी पाठींबा देण्याचे निश्चित केले आहे असे हेमंत गोसावी यांनी सांगितले.
मराठी गिरणी कामगारांनी मुंबईचा विकास केला त्यांच्या मागण्या योग्य असून मुंबईतच हक्काची मोफत घरे मिळालीच पाहीजेत यासाठी ४२ वर्ष लढा सुरू आहे.
महाराष्ट्रातील लाखो मराठी तरुणांचा मुंबईतील कायमचा रोजगार शासनाच्या मालक धार्जिनी धोरणामुळे उध्वस्त केला गेला आहे. याला सर्वस्वी शासन व भ्रष्ट राजकीय व्यवस्थाच कारणीभूत आहे. गेले ४२ वर्षे गिरणी कामगार आपल्या मुंबईतील अस्तित्वासाठी डोळ्यात प्राण आनुन न्यायाच्या प्रतिक्षित आहे. मला न्याय कधी मिळणार ? याचा विचार करत आहे. असे समन्वयक रमाकांत बने यांनी सांगितले.
समन्वय समितीचे हेमंत गोसावी, अरविंद घाग, विवेकानंद बेलुसे, हणुमंत निकम, संभाजी नलगे, अशोक रेवळे, लक्ष्मिकांत पाटिल, सिद्धार्थ चव्हाण, नथुराम सराटे,हरिशचंद्र करगळ. जिते आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.