तळमावले/वार्ताहर :;अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या वज्र प्रोडक्शनची ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रात्री 7.00 वाजता प्रसारित होत आहे. या मालिकेच्या सेटवर भेट देण्याची संधी शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांना मिळाली. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे शिवानी नाईक (अप्पी), रोहित परशुराम (अर्जुन), साईराज केंद्र (अमोल सिम्बा), ज्योत्सना पाटील (मोना), पुष्पा चौधरी (मनीषा), दिग्दर्शक रोहित पवार यांना त्यांच्या मूळ नावात त्यांच्या समोर लाईव्ह अक्षरगणेशा रेखाटून डाॅ.संदीप डाकवे यांनी भेट दिला. सेटवरील सर्व उपस्थितांनी डाॅ.डाकवे यांच्या कलेचे कौतुक केेले.
‘‘आपण रेखाटलेला अक्षरगणेशा खूप सुंदर आहे, याची फ्रेम करुन मी घरी लावणार आहे, या अनोख्या भेटीबद्दल आपले मनापासून आभार..’’ अशा शब्दात अभिनेता रोहित पुरुषोत्तम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, डाॅ.संदीप डाकवे यांनी आपल्या वडिलांवर लिहलेल्या ‘तात्या’ या पुस्तकाची एक प्रत अभिनेत्री शिवानी नाईक यांना दिली. या पुस्तकाचे वाचन करुन सदर पुस्तकाचा अभिप्राय आपणास देतेे असे अभिनेत्री नाईक यांनी सांगितले.
अभिनेता रोहित पुरुषोत्तम यांनी दिलेल्या अनोख्या प्रेमाबद्दल डाॅ.संदीप डाकवे व त्यांचे सहकारी भारावून गेले. एक कलावंत दुसऱ्या कलावंतांचा कसा आदर करतो याचे या निमित्ताने प्रात्यक्षिक पहायला मिळाले. रोहित पुरुषोत्तम यांच्यामुळे डाॅ.डाकवे यांचा अन्य कलाकारांशी छान संवाद साधता आला. अभिनेते शिवराज फाटक, अमोल लोहार, शुभम दाभाडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
सेलिब्रिटीज किंवा अन्य मान्यवर यांना अक्षरगणेशा भेट देणे हा छंद केवळ न जोपासता त्या माध्यमातून सामाजिक जाणीवाही जपण्याचे काम चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे. अक्षरगणेशाच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो रुपयांचा निधी गरजूंना दिला आहे.
यापूर्वीही त्यांनी विविध मालिका, चित्रपट यांच्या सेटवर जावून आपली कला सादर केली आहे. नाना पाटेकर, प्रशांत दामले, डाॅ.गिरीश ओक, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, आदेश बांदेकर, डाॅ.अमोल कोल्हे, वैभव मांगले, स्पृहा जोशी, अशोक शिंदे, रविंद्र बेर्डे, सुरेखा कुडची, महेश सलागरे, सुबोध भावे, अभिजीत खांडकेकर, अनिता दाते, मकरंद अनासपुरे, जयराज नायर, संजय नार्वेकर, सागर कारंडे, भाऊ कदम, प्राजक्ता माळी आदींसह विविध क्षेत्रातील सुमारे 14 हजाराहून अधिक मान्यवरांना कलाकृती दिल्या आहेत. ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड आणि वर्ल्ड ग्रेटेस्ट बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये तीनदा, हायरेंज बुक ऑफ रेकाॅर्ड, आणि द ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकाॅर्ड या पुस्तकांनी घेतली आहे.
डाॅ.संदीप डाकवे यांना आता ‘लिम्का बुक ऑफ रेकाॅर्ड’ आणि ‘गिनीज बुक ऑफ रेकाॅर्ड’ खुणावत आहे. या रेकाॅर्ड ला गवसणी घालण्याचे स्वप्न असल्याचे डाॅ.डाकवे यांनी सांगितले आहे.
‘अप्पी आमची कलेक्टर’ च्या सेटवर डाॅ.संदीप डाकवेंच्या अक्षरगणेशाची जादू
RELATED ARTICLES