मुंबई(रमेश औताडे) : पहिली बेटी धनाची पेटी , आई वडिलांची जास्त काळजी मुलगीच घेत असते , मुली शिवाय घराला घरपण नाही , असे कौतुक मुलींचे केले जाते ते खरेच आहे. याचा प्रत्यय एका मुलीने आपले यकृत आजारी वडिलांना देऊन त्यांना जीवनदान दिले असल्याची घटना मुंबईत घडली आहे.
१२ तासाची शस्त्रक्रिया, ४ यकृत प्रत्यारोपण डॉक्टर, सहायक डॉक्टर असा सर्व चमूने यकृत शत्रक्रिया यशस्वी केली. जॉय सेटल्हारे या मुलीने तिचे ५९ वर्षाचे वडील ओडूस्ते सेटल्हारे यांना यकृत देऊन त्यांना जीवनदान दिले.
दक्षिण आफ्रिकेतील बोत्सवानचे रहिवाशी असलेले हे दोघेजण भारतात स्वस्तात प्रत्यारोपण होत असल्याने व शस्त्रक्रियेचा सक्सेस दर जास्त असल्याने मुंबईत आले व त्यांनी वोकहार्ट रुग्णालयाचे यकृत प्रत्यारोपण करणारे डॉ. टॉम चेरियन यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
यावेळी बोलताना डॉ. टॉम चेरियन म्हणाले तामिळनाडू सरकार अवयव प्रत्यारोपण साठी २१ लाखाची मदत करत आहे. महाराष्ट्रात मात्र पैसे मिळत नाहीत.वोकहार्ट रुग्णालयात २५ लाख रुपये खर्च येतो. जर तामिळनाडू सरकार प्रमाणे महाराष्ट्रात सरकारने २१ लाख दिले तर ४ लाख रुपयाचा भार रुग्णावर पडेल व त्याला जीवनदान मिळेल.