मुंबई (शांताराम गुडेकर ) : रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, नवी मुंबई माजी उपमहापौर आणि लांजा राजापूर विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून निवडणुक लढवण्यास इच्छुक असलेले श्री. अविनाश लाड यांनी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई,शाखा लांजाच्या प्रमुख पदाधिकारी यांची भेट घेऊन सामाजिक – राजकीय विषयांवर चर्चा केली.
काही महिन्यावर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवार घेतलेली ही भेट एकंदरीतच तालुक्याच्या राजकीय – सामाजिक क्षितिजावर चर्चेचा विषय बनला आहे.विद्यमान काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री.अविनाश लाड यांनी २०१९ ची विधानसभा काँग्रेस पक्षातून लढवली होती. परंतु त्यांना अगदी निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.त्या निवडणुकीत मतदारसंघात ७०% हुन अधिक असणाऱ्या कुणबी – शेतकरी – बहुजन समाजाने श्री.अविनाश लाड यांना भरभरून मतदान केले होते.पराभवानंतरही त्यांनी या मतदार संघात त्यांनी चांगला जनसंपर्क ठेवला आहे.कोरोना काळात त्यांनी या मतदार संघात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.या भेटी प्रसंगी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा अध्यक्ष संतोष माटल,सेक्रेटरी संदिप पडये,सहसेक्रेटरी प्रशांत कुळये,लांजा शाखा सक्रिय पदाधिकारी मनोहर लोकम,शाहू सावंत,रमेश आग्रे,संजय पडीये,प्रदीप भितळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
लांजा-राजापूर विधानसभेसाठी निवडणुक लढवण्यास इच्छुक असलेले अविनाश लाड यांनी घेतली कुणबी समाजोन्नती संघ मुंबई,शाखा लांजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट
RELATED ARTICLES