Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रजीवनी आलो तर अर्थ पण समजून घेऊ - सौ. वसुधा वैभव नाईक

जीवनी आलो तर अर्थ पण समजून घेऊ – सौ. वसुधा वैभव नाईक

प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे आयोजित तिसरे राज्यस्तरीय राजकुमार काळभोर मराठी साहित्य संमेलन याच्या संमेलन अध्यक्ष माननीय सौ.वसुधाताई नाईक, सुप्रसिद्ध साहित्यिका या होत्या. संमेलनाचे उद्घाटन अ. भा.म. सा. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रा. शरद गोरे यांनी केले.

.जि.संघटक,शिवसेना मा. श्री. निलेश दादा काळभोर व अ. भा. म. सा. प. उपाध्यक्षा श्रीमती शुभांगी ताई राजकुमार काळभोर हे होते.
मा.शरदजी गोरे यांनी आपल्या भाषणात माणसाच्या भावना,चेतना याचे बिजारोपण साहित्यिक करत असतात. माणुसकी हा एक धर्म आहे. आणि स्त्री-पुरुष ही जात आहे. लालसा कोणाच्याही मनात नसावी. स्त्रीचे स्थान खूप मानाचे आहे. त्याचप्रमाणे संमेलनाचा रथ अनेक साहित्यिकांच्या हाताने पुढे नेला जातो असे त्यांनी सांगितले.
मा. सौ. वसुधाताई नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाला गणेश वंदनाने सुरुवात केली. स्वर्गीय राजकुमार काळभोर यांचा थोडक्यात परिचय दिला. हा सन्मान शरद गोरे यांच्या मुळे मिळाला आहे सांगितले.
निसर्गाचे आपण थोडे ऋण मानण्यासाठी आपण पर्यावरण सांभाळू या, वृक्षारोपण करून आपली सामाजिक बांधिलकी जपूया असेही त्यांनी सांगितले.
निसर्ग माझा सखा
निसर्ग माझा गुरु
उपकार त्याचे जाणू
सदैव त्याला स्मरु
त्या चारोळीतून त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्या.
जीवनी आलो आहोत तर अर्थ पण समजावून घेऊ. या विषयावर बोलताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा फुले यांची उदाहरणे दिली.
‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे त्या सामाजिक सेवा करतात त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली.
सर्वांची सेवा करताना जो आनंद मिळतो तो लाख मोलाचा असतो असे त्यांनी सांगितले.
तसाच आणखी एक विचार त्यांनी मांडला- जर लेखन झालेच नसते तर!
तर साहित्यिक निर्माण झाले नसते. रामायण महाभारत आपल्याला समजले नसते. संतांची वाणी समजली नसती. पुस्तके वाचनाने आपले मतपरिवर्तन होते हे झाले नसते. आपल्याला थोरांचे ज्ञान माहित झाले नसते. असे अनेक विषय त्यांनी हाताळले.
सुविचारातून माणूस घडतो. छोट्या छोट्या चारोळीतून मोठा अर्थ लपलेला असतो.कवितेच्या पाच कडव्यात पूर्ण जीवन सार असते.
तर कविता लिहा,कविता वाचा,कविता ऐकवा अशा संमेलनामुळे आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते त्याचा आपण फायदा घ्यावा. असे संमेलनाअध्यक्ष यांनी आपले विचार मांडले. सर्व कवींचे खूप, खूप कौतुक केले.
सरते शेवटी त्यांनी मुख्य संयोजकांचे म्हणजेच मा. प्रा. सुरेश वाळेकर, मा. ज्ञानेश्वर धायरीकर, प्रा. किरण जाधव, मा. शुभम वाळुंज यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments