Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रआम आदमी पार्टी मुंबईतील सर्व ३६ जागांवर उमेदवार उभे करणार

आम आदमी पार्टी मुंबईतील सर्व ३६ जागांवर उमेदवार उभे करणार

मुंबई (रमेश औताडे) : “खोके सरकार” कडे लोककल्याणकारी कामासाठी वेळ नाही, राज्याच्या तिजोरीची एकत्रितपणे लूट करण्यात सरकार व्यस्त आहे असा आरोप करत आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी आम आदमी पार्टी मुंबईतील सर्व ३६ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

आम आदमी पक्ष मुंबईतील सर्व 36 जागा लढवणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात आमचे सहकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत आणि तयारी जोरात सुरू आहे. आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, लोकचळवळीतून उदयास आलेला पक्ष आज दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेवर आहे. आमचे गोवा आणि गुजरातमध्ये आमदार आहेत आणि संसदेत खासदारांची संख्या लक्षणीय आहे.अशी माहिती प्रीती शर्मा मेनन यांनी यावेळी दिली

सध्याच्या भाजप-शिंदे सेनेच्या नेतृत्वाखालील ‘खोके सरकार’ कडे लोकहितासाठी शून्य राजकीय इच्छाशक्ती आहे आणि त्याऐवजी ते केवळ भ्रष्टाचारातच व्यस्त आहेत, कारण त्यांना खात्री आहे की ते सत्तेत पुन्हा येणार नाहीत. एकनाथ शिंदे सरकार हे राज्याच्या तिजोरीची एकत्रितपणे लूट करण्याशिवाय दुसरे काही करत नाही. भाजप-शिंदे सेनेने केवळ राज्यघटनेची फसवणूक केली नाही. बेरोजगारी आणि महागाईने आम आदमीचे कंबरडे मोडले आहे. कृषी संकट आणि संबंधित शेतकरी आत्महत्या अव्याहतपणे सुरू आहेत.असे आरोप प्रीती शर्मा मेनन यांनी यावेळी केले.

“मुंबईतील बीएमसीसह महाराष्ट्रातील २७ महानगरपालिकांपैकी कोणत्याही महानगरपालिकेत लोकप्रतिनिधीत्व नाही. मुंबईतील पायाभूत सुविधांची दुरावस्था झाली आहे. गृहनिर्माण हा एक न सुटलेला प्रश्न राहिला आहे. झोपडपट्ट्याची स्थिती दिवसेंदिवस हलाखीची बनत आहेत. बिल्डर आणि कंत्राटदार माफियांनी शहराचा ताबा घेतला आहे असे प्रीती शर्मा मेनन यावेळी म्हणाल्या.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments