तापोळा- शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षे पदवीधर शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र सेवा कार्य करणाऱ्या तापोळा विभागातील ४ शिक्षकांना सातारा जिल्हा परिषदीने केंद्रप्रमुख पदोन्नती देण्यात आली. शिक्षण प्रक्रियेत केंद्रप्रमुख हे महत्वाचे अधिकारी आहेत या या पदोन्नती मुळे तापोळा ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी फायदा होणार आहे.
श्री आनंद नारायण संकपाळ- (वेळापूर )
१९८५ साली प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी सेवा सुरू केली. आदर्श शिक्षक, इंग्रजी विषयाचे उत्तम अध्यापक, उत्तम प्रशासक, सर्व शिक्षक बांधव यांना संघटित करून काम करण्याची कला असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले श्री आनंद संकपाळ. जि प प्राथमिक सौंदरी येथे मुख्याध्यापक कार्यरत होते त्यांना येरणे केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती देण्यात आली.
श्री चंद्रकांत कृष्णा जंगम (तळदेव )
श्री जंगम सर याना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून जंगम सर काम केले आहे. जंगम सर यांना मांघर केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे.
श्री संजय पांडुरंग आटाळे – ( केळघर सोलशी )
तापोळा येथे तालुका मास्टर म्हणून जबाबदारी घेऊन काम पाहिलेले, प्रशासन कामाची आवड असलेले, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कायम आग्रही असलेले श्री संजय आटाळे सर. एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. श्री आटाळे सर यांची पाटण तालुक्यात बेलवडे खुर्द या केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे.
श्री राजन देशमुख- (निवळी)
तापोळा भागातीळ अत्यंत दुर्गम गाव म्हणजे निवळी गाव. या गावातील श्री राजन देशमुख सर यांनी तापोळा विभागातील काही गावात सेवा केली आहे. संगीत कलेत प्राविण्य असलेले देशमुख सर यांची सातारा तालुक्यातील जकातवाडी या केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे.
केंद्रप्रमुख पदी निवड झालेल्या सर्व केंद्रप्रमुख यांना पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा. केंद्रप्रमुख निवड झालेल्या सर्वांचे विभागातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे…..