Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रयेडेमच्छिंद्र येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

येडेमच्छिंद्र येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

प्रतिनिधी(सत्यवान मंडलिक) : येडेमच्छिंद्र हे गाव म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांचे जन्मगाव. त्यांच्या क्रांतिकारक कारकिर्दीने पावन झालेली ही भूमी इतिहासात अजरामर झाली. म्हणूनच वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र या गावाचे नाव भारत देशाच्या नकाशावर कोरले गेले.आज त्यांच्या जयंती दिनी त्यांच्या कार्याच्या आठवणीने सर्वांना प्रेरणा मिळते व याच प्रेरणेने येथे अनेक क्षेत्रात क्रांती घडताना दिसते.
श्री मच्छिंद्रनाथ हायस्कूल व कन्या प्रशाला येडेमच्छिंद्र येथे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा.अजितराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक श्री बी.एन.सावंतसर यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांना पुष्पहार अर्पण करून जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी मुख्याध्यापक श्री सावंतसर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नाना पाटलांचे क्रांतिकारी विचार मांडले. नाना पाटील यांच्या प्रखर देशभक्ती मुळेच जनमानसात स्वातंत्र्यची प्रेरणा निर्माण होवुन अनेक लढे उभारले गेले व देशाला स्वातंत्र्य मिळाले असे विचार व्यक्त करुन विध्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे संबोधन केले.
या प्रसंगी गावातून क्रांतिसिंह नाना पाटलांच्या जयघोषात गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यात आली व गावातील पूर्ण आकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी कन्या प्रशाला मुख्याध्यापिका व्ही. आर. पंडित मॅडम ,सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments