प्रतिनिधी(प्रताप भणगे) : खड्यांचा महापूर असलेल्या पुणे-कोल्हापूर हायवेच्या दुरावस्थेविरोधात तासवडे टोल नाका येथे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण,आम.विश्वजित कदम,उदयसिंह पाटील उंडाळकर,यांचेसह उपस्थित बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या समवेत आंदोलन करण्यात आले..खड्ड्यांनी भरलेल्या बंगळुरू- मुंबई महामार्गावर टोल का द्यायचा ? हा सर्वांसमोर पडलेला खूप मोठा प्रश्न आहे. पुणे ते बंगळूरू रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाली आहे. सांगली, कोल्हापुरातून पुण्यात जायला सहा ते सात तास वेळ लागत आहे. या रस्त्याचे काम लवकर व्हावे, खड्डे असलेल्या ठिकाणी लगेच दुरुस्ती करावी आणि जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल आकारणीस आमचा विरोध असेल. या विरोधात सांगली, सातारा, पुणे काँग्रेस कमिटीच्या वतीने ही कोल्हापुरातील किणी तसेच आनेवाडी, खेड शिवापूर येथील टोल नाक्यांवर स्थानिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत जोरदार आंदोलन करण्यात आले. याची सरकारने तत्काळ दखल घ्यावी अशी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी मागणी केली आहे.
