Friday, August 1, 2025
घरमहाराष्ट्रसाश्रु नयनांनी टिळक स्मारकवर आदरांजली

साश्रु नयनांनी टिळक स्मारकवर आदरांजली


प्रतिनिधी : १ ऑगस्ट लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी दिनी लोकमान्य टिळकांच्या समाधी स्थळी येताना ज्येष्ठ भाजप नेते आशिष कुमार चौबे अक्षरशः भारावले होते. जणु लोकमान्यांचा जाज्वल्य इतिहास त्यांच्या डोळ्यापढुन सरकत होता. राज्यपाल,मुख्यमंत्री या पवित्र स्थानापासुन दूर असल्याचे पाहुन त्यांना खंत वाटली. मी मुख्यमंत्र्यांना भेटेन आणि त्यांना संहीतेची जाणीव करून देईन, शिवाय मा पंतप्रधान मोदीजींन या पवित्र स्थळी घेऊन येईन. बिहारचे नीरज कुमार म्हणाले, मजफ्फरपूच्या तरुण खुदीराम बोनसच्या समाधी स्थळी ब़िहारचे मुख्यमंत्री व राज्यपाल भुत असणारे लोकमान्य टिळक महाराष्ट्रातल्या नेत्यांना प्रेरणादायी वाटत नाहीत का ? प्रकाश सिलम म्हणाले, लोकमान्य टिळकांच्या समाधी स्थानी जयंती , पुण्यतिथी दिनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आमंत्रण करावे लागणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेही दुर्दैव आहे . सत्तास्थानी असणाऱ्यांना भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास माहीत का असु नये?
१०.२० वाजेपर्यंत चौबे जींनी मा मुख्यमंत्री यांची वापर पाहिल्यानंतर स्मारकासमोर ध्वजारोहण केले. प्रकाश सिलम यांनी अश्विनीकुमार चौबे यांना पगडी देऊन बहुमान केला.
प्रती वर्षाप्रमाणे सेवा दलाच्या युवकांनी तसेच भाजपचे अतुल शहा . प्रभाकर मेहेंदळे ( लोकमान्य टिळकांचे नात जावई ) शिवसेनेचे दिलीप नाईक, सुरेश सरनोबत , गिरीश वालावलकर यांची या प्रसंगी उपस्थिती होती. दुपारी आशिष शेलारही आले होते.
लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश सिलम, नंदकुमार मादुस्कर, रागिणी रावल, संतोष गाजुल, गिरीश कुलकर्णी, बाळासाहेब हेगडे जयंत पुपाला यांनी स्मारक समितीतर्फे आयोजन केले.
‌‌. बृहन्मुंबई महानगरपालिका‌ मुख्यालयाचे सर्व महिला अधिकारी यांनी लोकमान्य टिळकांना आदरांजली वाहिली.
बृहन्मुंबई महानगरपालिका ड विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे व त्यांचे सहकारी मनोज जेऊरकर , रावसाहेब सांगोलकर यांनी समाधी परिसराचे उत्तम व्यवस्थापन केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments