मुंबई (रमेश औताडे) : हरियाणा सरकार प्रमाणे कंत्राटदार विरहित वयाच्या ६० वर्षा पर्यंत शाश्वत रोजगार मिळवा यासाठी राज्यातील वीज कंत्राटी कामागर आक्रमक झाले असून त्यांनी १२ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ऊर्जा मंत्र्याच्या घरासमोर साखळी उपोषणाचा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ( संलग्न भारतीय मजदूर संघ ) चे प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी गुरुवारी दिला.

आता आचारसंहितेची चाहूल लागली असल्याने आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी २० ऑगस्ट रोजी सर्व मंत्र्यांच्या दारात लाक्षणिक आंदोलन नंतर २४ऑगस्ट उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्या नागपुरातील घरा पर्यंत मोर्चा काढून तेथे वीज कंत्राटी कामगार बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी सांगितले.
तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांचे शोषण कायमस्वरूपी थांबण्यासाठी नॉमिनल मस्टर रोल किंवा
हरियाणा सरकार प्रमाणे कंत्राटदार विरहित वयाच्या ६० वर्षा पर्यंत शाश्वत रोजगार मिळवा यासाठी वेळोवेळी आंदोलने केली मात्र आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. त्यामुळे आता राज्यातील सर्व संघटना व कामगारांनी या निर्णायक आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आवाहन संघटन मंत्री उमेश आणेराव यांनी केले.