प्रतिनिधी (शांताराम गुडेकर ) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या मु. पो.आंगवली मधील आरोग्य उपकेंद्र( आंगवली )येथ प्रथमच नव्याने(सी.एच.ओ)पदीडॉ.सौ.पूनम चंद्रकांत सुवारे (पूनम प्रथमेश सुर्वे )यांची शासनाने नियुक्ती केली असून त्यांनी आपला पदभार सोमवारी स्वीकारला.आज त्यांचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते/पत्रकार युयुत्सु आर्ते आणि आंगवली गावातील निर्भीड पत्रकार संदीप गुडेकर यांनी केले. त्यांना यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.या उपकेंद्रमध्ये आता गोळ्या ओषेध उपलब्ध आहेत. टीबी किंवा तर आजारावर इलाज उपलब्ध आहेत.आता फक्त इंजेकशन,सलाइन, एक्स-रे,आदी सेवा तात्काळ शासनाने उपलब्ध करून करून द्यावेत.यासाठी शासनाने,लोकप्रतिनिधी यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करावा.याबाबत आज चर्चा करण्यात आली.आमसभामध्ये या बाबत मागणी करण्यात येणार असून त्याचा फायदा आंगवली -सोनारवाडी,बोडये, कासार कोळवण,मारळ, बामणोली, ओझरे बुद्रुक या गावातील रुग्णांना फायदा होईल त्यामुळे निवे खुर्द येथे जाण्याचा प्रवास खर्च, वेळ, पायपीट थांबणार असल्यामुळे या गावातील लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.यावेळी आरोग्य केंद्र मदतनीस मानसी अणेराव,आरोग्यसेविका सौ.स्नेहल सुर्वे,आशा सौ.यशश्री शिंदे, आरोग्यसेविका खेडकर आदी कर्मचारी उपस्थित होते.
