प्रतिनिधी : इंडियन ग्लोरी अवॉर्ड्स, भारत सरकार प्रस्तुत आंतरराष्ट्रीय साहित्य परिषद – २०२४ मध्ये नामांकन होऊन मंगळवार दि. १८ जुलै २०२४ रोजी दिल्ली येथे प्रसिध्द साहित्यिक, समाजसेवक व उद्योजक डॉ. शांताराम कारंडे यांना इनोव्हेटिव्हस बिजनेसमेन ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार घेण्यासाठी डॉ. कारंडे यांना नियोजित कार्यक्रमामुळे दिल्ली येथे जाणे शक्य नसल्याने संस्थेने कुरिअर द्वारे पाठविला. तो पुरस्कार व्यावसायिक दीपक शहा यांनी बांद्रा पूर्व येथील आर्क वि शान इन्फ्राटेक लि. या त्यांच्या कार्यालयात आणून डॉ. कारंडे यांना स्वाधीन केला. त्यावेळी आर्क वि शान इन्फ्राटेक लि.चे पार्टनर नरेश पाटील उपस्थित होते. डॉ. कारंडे हे उद्योजक असले तरी ते कवी, लेखक, संपादक, वास्तुविशारद, विकासक व मनसे नेते आहेत. त्यांचे शेकडो लेख व १५ कवितासंग्रह प्रकाशित आहेत. तसेच डॉ. कारंडे हे फिल्मी निर्माता व दिग्दर्शक सुद्धा आहेत. त्यांनी आजतागायत २४ शॉर्टफिल्म, ७ गाणी आणि १६ मराठी नाटकांची निर्मिती केली आहे. डॉ. कारंडे यांना हा २०३ वा पुरस्कार मिळाल्याने डॉ. कारंडे यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
