Monday, August 25, 2025
घरमहाराष्ट्रप्रशासकीय अधिकारी होण्याच्या स्वप्नांना नवे पंख

प्रशासकीय अधिकारी होण्याच्या स्वप्नांना नवे पंख

मुंबई (रमेश औताडे) : युपीएससी व राज्य सेवा स्पर्धा परिक्षा या देशातील अत्यंत कठीण परीक्षा समजल्या जातात. या परिक्षांमधून देशाच्या प्रशासनात एक कौशल्याधिष्ठीत व मुल्याधिष्ठीत समाजिक जाण असणारा युवक जावा, व त्याचा देश उभारणीच्या कार्यात हातभार लागावा यासाठी “ एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ” ने एक नवीन आगळे वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या व्यासपीठाची माहिती एमआयटी चे संचालक डॉ. सुजित धर्मपात्रे यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

एमआयटी एडीटी विद्यापीठाचा कॅम्पस हा १२५ एकरमध्ये पसरलेला असून तो, जागतिक दर्जाच्या विविध क्रीडा तसेच अन्य सोई सुविधांनी सुसज्ज असा आहे. यासह, या कोर्स शिकविण्यासाठी युपीएससी सारख्या स्पर्धा परिक्षांचा दांडगा अनुभव असणारे, तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाची उत्तम संधी आहे. mitsics.edu.in या संकेतस्थळावर अथवा,
९६०७५८००४२/५२ या क्रमांकावर संपर्क साधावा
असे आवाहन डॉ. सुजित धर्मपात्रे यांनी यावेळी केले.

यु पी एस सी चे माजी चेअरमन डॉ.डी.पी. अग्रवाल, तेलंगणाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक महेश भागवत, नाबार्डचे माजी चेअरमन डॉ.एम.एल. सुखदेवे व अनेक तज्ञांचे योगदान या व्यासपीठासाठी लाभले आहे. विद्यार्थी उत्तीर्ण होण्याकरीता अभ्यासासोबतच त्यांच्या आवडी-निवडी ओळखून कौशल्याधिष्ठीत प्रशिक्षण देणाऱ्या विषयांचा समावेशही केलेला आहे. असे डॉ. सुजित धर्मपात्रे यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments