Sunday, August 24, 2025
घरमहाराष्ट्रधारावी पुनर्विकासाला गतिमान करण्यासाठी जनजागृती मोहीम राबविणार - डिआरपीचे सीईओ श्री. एस....

धारावी पुनर्विकासाला गतिमान करण्यासाठी जनजागृती मोहीम राबविणार – डिआरपीचे सीईओ श्री. एस. व्ही. आर. श्रीनिवास यांचे आश्वासन; धारावीचा मास्टर प्लॅनचे प्रदर्शन भरवणार

मुंबई प्रतिनिधी : अदानी समूहाची डीआरपीपीएल कंपनी आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प या दोन्ही संस्थांना धारावीतील जनता सातत्याने विरोध करत आहे.तर दुसर्‍या बाजूला धारावी नागरिकांकडून बायोमेट्रिक सर्व्हेला ही विरोध होत असल्याने धारावीतील लोक संभ्रमात आहेत.म्हणूनच धारावी पुनर्विकासाबाबत रहिवाशांच्या मनात असणार्‍या हजारो शंका दूर करण्यासाठी आणि त्यांचा विरोध थांबला पाहिजे म्हणून लवकरच आम्ही जनजागृती मोहिमेचे आयोजन करणार आहोत.
तसेच धारावीचा मास्टर प्लॅन तयार करून त्याचे जाहीर प्रदर्शन भरवण्यात येईल .असे आश्वासन धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्याधिकारी श्री.एस.व्ही.आर.श्रीनिवास यांनी शिष्टमंडळाला दिली.

धारावी पुनर्विकासाच्या मुद्यावरून धारावीतील जनतेत संभ्रम निर्माण झालेला असून लोकांमध्ये अदानी विरोधी वातावरण अशा सर्व विषयांना घेऊन नागरिक आणि समाज विकास कल्याण असोशीएशन या संस्थेच्या शिष्टमंडळाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्याधिकारी श्री.एस.व्ही.आर.श्रीनिवास यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. या शिष्टमंडळात संस्थेचे पदाधिकारी दिपक कैतके,शैलेन्द्र कांबळे,दीपक पवार आदि प्रतीनिधी होते.धारावी पुनर्विकासाबाबत रहिवाशांच्या मनता हजारो शंका दूर झाल्या पाहिजेत.जनतेत पुनर्विकासाबाबत विश्वास निर्माण व्हावा,धारावी पुनर्विकासासंदर्भात बैठका झाल्या पाहिजेत, संवाद झाला पाहिजे, प्रकल्पाबाबत जनजागृती निर्माण केली पाहिजे. पारदर्शकता असली पाहिजे.तसेच धारावीचा मास्टर प्लॅन तयार करून त्याचे प्रदर्शन धारावीत भरून लोकांचा विश्वास डीआरपी ने संपादन केला पाहिजे. अशा विविध प्रश्नांना घेऊन डीआरपीचे सिईओ श्रीनिवास यांच्याशी चर्चा केली अशी माहिती शैलेन्द्र कांबळे ,दीपक कैतके यांनी दिली.

धारावी प्रकल्प हा पूर्ण होणारच मात्र या प्रकल्पाला गती देण्यासाठी पहिल्या प्रथम सर्वेक्षण केले पाहिजे म्हणून आम्ही सर्वेक्षण सुरू केले आहे.काम सुरू आहे. मात्र आपल्या संस्थेने दिलेल्या सूचना आणि केलेल्या मागण्यावर आम्ही निश्चित सकारात्मक विचार करू. तुमच्या मागण्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्याधिकारी श्री.एस.व्ही.आर.श्रीनिवास यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी श्रीनिवास म्हणले की, स्थानिक समुदायाच्या गरजा, त्यांच्या समस्यां मांडण्यासाठी स्थानिक संस्था,संघटना,आंदोलनकर्ते यांच्या प्रतींनिधी सोबत आम्ही सातत्यानी चर्चा करणार. व्यक्ती किंवा संस्थांसोबत बैठका करणार. धारावी पुनर्विकासाबाबत रहिवाशांच्या शंका दूर करण्यासाठी आणि प्रकल्पाला गती देण्यासाठी धारावीत जनजागृती मोहिम राबविणार.जनजागृती मोहिमे अंतर्गत आराखडा विषयी आणि विविध प्रश्नांना घेऊन कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात येईल. तसेच धारावीचा मास्टर प्लॅन, एक आराखडा ,एक मोडेल तयार करून त्याचे जाहीर प्रदर्शन भरवणार आणि हे प्रदर्शन धारावीतील जनतेसाठी खुले करून जनतेत विश्वास निर्माण करणार असे आश्वासन मुख्याधिकारी श्रीनिवास यांनी दिले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments