सातारा(अजित जगताप) : हरियाणा राज्य सरकारने मा सरपंचांना पेन्शन योजना लागू केली आहे. त्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने सुद्धा सरपंचांना पेन्शन योजना सुरू करावी. सरपंचांना १५ हजार रुपये मानधन सुरू करावे. त्या मागणीसह या वेळेला सरपंच परिषदेला मिळालेल्या बोधचिन्हाचे हे शुभारंभ करण्यात आला व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार ही झाला.
सरपंच प्रतिनिधी आमदार नियुक्त करावे.१५ लक्ष रुपयाचे काम करण्याचे अधिकार ग्रामपंचायतला पुन्हा पूर्ववत करावेत.इत्यादी मागण्या मंजूर कराव्यात याबाबतची चर्चा करून मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देणे तसेच आजी माजी सरपंच उपसरपंच यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणे तसेच मंत्रालयावर राज्याच्या सरपंचांचा मोर्चा काढणे. याबाबतचा विचार विनिमय करण्यासाठी बैठक संपन्न झाली.सरपंच परिषद संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या मार्गदर्शनाने व सरपंच संघटनेचे पदाधिकारी अरुण कापसे, महेश गाडे,आनंदराव जाधव, संजय शेलार, समाधान पोफळे, प्रशांत पवार, चंद्रकांत सणस ,शत्रुघ्न धनवडे, उमेश दिसले , व जिल्हाध्यक्षपदी विराजमान झालेल्या वाढे गावच्या सरपंच मेघाताई नलवडे यांचा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सरपंच परिषदेला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी भोसले यांनी दिली.
