प्रतिनिधी (प्रताप भणगे) : कराड तालुक्याचे महसूल नायब तहसीलदार आनंदराव देवकर यांची नुकतीच बदली झाली असून त्यांच्या जागी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथील नायब तहसीलदार उबारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नायब तहसीलदार उबारे यांनी आज एक ऑगस्ट 2024 रोजी कराल तहसील कार्यालयातील महसूल नायब तहसीलदार या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पाडळी केसे तालुका कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि लोकाधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या हस्ते बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाडळी( केसे) येथील ओमकार नलवडे सह नागरिक उपस्थित होते.
