Wednesday, August 6, 2025
घरमहाराष्ट्रशिवसेना( उबाठा) ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिमतर्फे शिधावाटप केंद्र येथे ग्राहकांना होणाऱ्या...

शिवसेना( उबाठा) ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिमतर्फे शिधावाटप केंद्र येथे ग्राहकांना होणाऱ्या ई -पॉस मशीनच्या अडथळ्यामुळे धान्य मिळत नाही यावर चर्चा

मुंबई (शांताराम गुडेकर ) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम ग्रा.स.क.विधानसभा संघटक श्री.अमित भाटकर यांच्या नेतृत्वाखाली आज घाटकोपर शिधावाटप केंद्र येथे ग्राहकांना होणाऱ्या ई - पॉस मशीनच्या अडथळ्यामुळे धान्य मिळत नाही तसेच गणेशोत्सव सणा निमित्त आनंदाचा शिधा वाटप बद्दल चर्चा करण्यात आली.शिधावाटप केंद्रामधील मुख्य अधिकारी श्री.वानखेडे याची भेट घेऊन उपरोक्त बाबींवर चर्चा करण्यात आली. त्याचवेळी मुख्य अधिकारी यांनी निर्णय घेतला की प्रत्येक रेशन दुकानदार यांनी मशीन बंद असल्यास ग्राहकांना रेशन कार्ड चेक करून ऑफलाईन पद्धतीने धान्य देण्यात येईल.त्यावेळी ग्राहक संरक्षण कक्षाच्या माध्यमातून निवेदन पत्र देण्यात आले.यावेळी घाटकोपर पश्चिम विधानसभा संघटक श्री. अमित भाटकर,उपसंघटक विश्वनाथ जाधव , वार्ड संघटक १२८ प्रशांत शिंदे, वार्ड संघटक १२९ शंकर तेली,वार्ड संघटक १२३ राजेंद्र पेडणेकर ,वार्ड संघटक १२४ यशवंत खोपकर आदी मान्यवर आणि शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments